166 पवित्र आत्म्याची अंतरीची साक्ष

मराठी

166 पवित्र आत्म्याची अंतरीची साक्ष पवित्र आत्मा दयावान ज्या ठायी राहिला तो भक्त जाहला खरा, उद्धार पावला ... 1 सदात्मा वस्ती अंतरी सद्भक्तांच्या करी तयाची मुद्रा त्यांवरी, ते पुत्र ईश्वरी ... 2 मला, हे आत्म्या, पटवी क्षमा कीं पावलो, प्रमाण तूंचि पूरवि पुन्हां मी जन्मलो ... 3 तूं माझ्या ठायी राहुनी दे मुक्तीचा विसार. वारी स्वपक्षी नेऊनि पाविव पूर्णोद्धार ... 4 - एच . Balentine _______________________________________________ 167 देवाजवळ पवित्र आत्म्याचे दान मागणे बापा दयावाना, जो ऐके प्रार्थना, द्यावे अता काना, करुनी करुणा; स्वबोलाला तूं आठवीं, खाली सदात्मा पाठवी ... 1 बाळांची मागणी मानव ऐकती, त्यां प्रिय मानुनी संतुष्ट करिती; तूं अमुचेही ऐकशी आम्हांस प्रेम दाविशी ... 2 बापा, दयाळा, ये, सदात्मा ईश्वरी आम्हांस आतां दे, तो राहो अंतरी; सर्वांस दे भक्तिभावा, तेव्हां तुझ्या वंदूं नांवा ... 3 आत्म्याची प्रेरणा होवोच चेतना देवोच चेतना प्रीतीचा होवो जाळ, तूं घालवी पापांधकार, आम्हां मृतांस दे उद्धार ... 4 - एच . Balentine