मराठी
168 पवित्र आत्म्याची अंतर्यामी वस्ती
हे आत्म्या, ये दया करी,
तूं माझ्या चित्ता ये धरी,
जरी मी केली हेलना
न काढी तूं सत्प्रेरणा ... 1
खरा मी घोर पातकी
खरा विश्वासघातकी,
हजारो झाले उपकार,
हजारो केलेही धिक्कार ... 2
तरी मला न घालवी,
मला नची तूं बुडवी,
तूं सत्य न्याया राखितां
मी नाशा पावें सर्वथा ... 3
उदारात्म्या, क्षमा करी,
तूं पापें दु:खे संहारी,
ख्रिस्ताची प्रीती दाखवी,
मनाला तेणे शांतवी ... 4
--एच . Balentine