मराठी
170 अनुग्रहदाता पवित्र आत्मा
हे देवा, आम्ही दैन्यवान,
सदात्मा आतां मागतों,
आम्हीच केला अपमान
यामुळें तो दुरावतो ... 1
हे आत्म्या, कृपा दाखवीं,
अम्हां दीनास शांतवी,
सत्ता मनात चालवी,
सुभावना तूं चेतवी ... 2
आम्हां तुझे निवासस्थान,
हे आत्म्या, मनी सर्वकाळ;
देई, देई कृपेचे दान,
करी तूं नित्य प्रतिपाळ ... 3
- एच. Balentine