171 मार्गदर्शी पवित्र शास्त्र

मराठी

171 मार्गदर्शी पवित्र शास्त्र हि देवाची खरी प्रेरणा नावरूप धरिती, विचरे जगती भक्त जियेला शास्त्र नाम देती ... ध्रु दिव्य खरे उपदेश यामधे, निषेध सांपडती, सुधारणेच्या हेंच नेऊनि सोडी दिव्यपथी ... 1 हेंच सांगते परमेशाला मान्य अशी नीती, हेंच उपजवी प्रभूसेवारत सिद्धांना जगती ... 2 --- ना.वा टिळक