मराठी
172 पवित्र शास्त्राचे कार्य
भवमार्गी पवित्र शास्त्र दीप लाविला,
अघतम वाराया जगतांत ठेविला ... ध्रु
अन्न जसे क्षुधिताला,
दृष्टी जशी अंधाला
अमृत जणु रुग्णाला,
शास्त्र महालाभ नरा प्राप्त जाहला ... 1
मनुजांतरदर्पण हा देवनरांतील पहा,
दिव्यकरारख्य महा शास्त्रग्रंथ
धन्य अति करी धरित्रीला ... 2
अज्ञाना साराया, ज्ञाना जागा द्याया,
जनसौख्या वाढविण्या, शक्य ईशवचन,
हेचि जोडी सिद्धीला ... 3
हिन दिन दु:खी दुबळी
जनता ज्या हेटाळी
तच्चीत्त्ता करी जवळी;
शास्त्र समाधानदायी मित्र भेटला ... 4
मंगलप्रद शास्त्राचे दान, प्रभुजी तुमचे;
भाग्य बहू मनुजांचे थोर,
स्तुतीवाद गाइ जगात आपुला ... 5
--- अज्ञात
________________________________________________________________
173 आशोत्पादक पवित्र शास्त्र
जीवनाची फळे सुखदायक हीं
ताव शास्त्री पाही दिसताती ... 1
माझी आवडती सर्वही संपत्ती
असो, जगत्पती, शास्त्र तुझे ... 2
तव शास्त्री माझे सुख समाधान
होती सर्व पूर्ण मनोरथ ... 3
तैसा सर्व माझ्या आशेचा उद्दम;
सुमंगलधाम, शास्त्री तुझ्या ... 4
शास्त्राचे पठण, श्रवण, मनन
हर्षे करो मन सदा माझे ... 5
---- ह. गो . केळकर