मराठी
174 शास्त्राचे अगत्य
शास्त्ररूप दिवा देवाने दिधला
वाट दावायाला पाप्यालागी ... 1
शास्त्राविण पाप्या कैसी दिसे वाट ?
अंधकार दाट जगदारण्यी ... 2
नि:शास्त्रावादी हे संगती कौतुक
सद्सद्विवेक हेंचि शास्त्र ... 3
तुम्हां आम्हां एक सद्सद्विवेक ;
मग कां अनेक भिन्न मतें ? ... 4
सद्सद्विवेक वाट दावायास
शास्त्राचा प्रकाश पाहिजेची ... 5
होऊनिया नम्र सोडा ऐसें मत ;
पाहा कि प्रचित सच्छास्त्राची ... 6
-- कृ. र. सांगळे