175 पवित्र शास्त्राचे श्रेष्ठत्व

मराठी

175 पवित्र शास्त्राचे श्रेष्ठत्व देवराया तुझी थोर कार्ये आम्ही पाहतो नेहमी चहूकडे ... 1 अंतरंग कोंदे आश्चर्ये आमुचे; मुखाने स्तुतीचे गान निघे ... 2 तरी तव ज्ञान, दया आणि बळ शास्त्री हि सोज्वळ दिसताति ... 3 असंख्य जे तारे नभांत असताति गती सांभाळिती अपुलालीं ... 4 तयांसी पाहता बहू ज्ञान आम्हा तुझे मंगलधामा, होय नित्य ... 5 देवा, तव शास्त्र मजला शिकवी; अपराध दावीं माझे मज ... 6 -- ह. गो. केळकर