176 आकाशांत दिसणारे वैभव

मराठी

176 आकाशांत दिसणारे वैभव आकाश दावी तुझे काम, प्रत्येक तारा दर्शवी, परी, प्रभो, तुझे हे नाम दिसे शास्त्रांत गौरवी; सूर्यादिकांचा नित्यक्रम तुझे सामर्थ्य दावितो; परी तुझे स्वच्छास्त्रि प्रेम व पूर्ण न्याय दिसतो ... 1 ते सूर्य चंद्र फिरतां सर्वत्र तेज पाडिती, तसे स्वच्छास्त्र कळतां तुझी ती वाणी ऐकती; तें सर्व जग व्यापुनी दिगंतरी प्रकाशणार, व ख्रिस्त राष्ट्रें तारुनी सर्वत्र राज्य स्थापणार ... 2 प्रभू , हे जगज्जीवना जगावरी उदय पाव, पाप्यांस दे सुभावना, तुझ्या मार्गी सर्वांना लाव, तुझी कृत्ये अत्यंत थोर, जगाचा साधीशी उद्धार, तूं सोडी त्यांचे पाप घोर, भक्तांस नेइ स्वर्गी पार ... 3 ---H Balentine