मराठी
178 सच्छास्त्राची आवड
किती सच्छास्त्र आवडे !
करिन नित्य ध्यान,
देउनी लक्ष त्याकडे
मी पावे समाधान ... 1
मी प्रात:काळी उठुनी
तें घ्याया लागतों,
तें ऐकायास इच्छूनी
जीव लुलपतो ... 2
सच्छास्त्र माझ्या अंतरी
बळाने ठसतें,
तेणें संसाराभीतरी
हे गीत सुचते ... 3
घरी कि रानी राहतां
मिष्टान्न तें अक्षय,
मधापरीस सर्वथा
तें गोड अतिशय ... 4
कुठेंच नाही ऐसें धन,
उत्कृष्ट राशि थोर,
रूपे कि सोनें शुष्क तृण
अशा द्रव्यासमोर ... 5
क्लेशानें जीव गळतां
हो शास्त्र पुर्णाधार,
देवाचें वाक्य स्मरतां
न भीती वाटणार ...6
---H BALENTINE