179 सच्छास्त्राची अमूल्यता

मराठी

179 सच्छास्त्राची अमूल्यता सच्छास्त्र, सच्छास्त्र, निधान अमोल, देवाचें सद्वचन प्रत्येक ओळ; त्यापुढें सोन्याचा करावा धिक्कार त्या शास्त्री कळे कवि होय उध्दार ... 1 सच्छास्त्र, सच्छास्त्र, सत्याचीच खाण, आबालवृद्धांस तें देतें सुज्ञान; तें सांगे मुलाला, कर्त्याला रे स्मर तारुण्यी ख्रिस्ताचा तूं आश्रय धर ... 2 सच्छास्त्र, सच्छास्त्र, हें प्रिय अपार, सर्वांस तें सांगे कि पावा उद्धार; या, सांगू तयाच्या भाका सर्वाना, सुज्ञाने भरू पृथ्वीच्या सीमांना ... 3 सच्छास्त्र, सच्छास्त्र, स्वदेशीं व दूर देवाची कृपा गा स्वराने मधुर, मैदानी व डोंगरी गाजवा फार कीं ख्रिस्त देईल सर्वांस उद्धार ... 4 ---H Balentine ______________________________________________________________ 180 सच्छास्त्राची उत्कृष्टता सच्छास्त्र, पहा तेजस्वी अत्यंत दिसते, आम्हां तयाने देवज्ञान अमूल्य लाधतें ... 1 संपत्ती तेणें अतिशय दरिद्री पावती, जें धन सर्वदा अक्षय तेचि संपादिती ... 2 ज्ञानाचे झाड तेजवान तेथें उगवतें, तयाचे फळ रसवान यथेच्छ मिळतें ... 3 येशूची प्रिय वचने तेथे सांपडती तेणें स्तुतीची गायनें मनांत सुचती ... 4 सच्छास्त्र , याचे मला ध्यान सदैव लाभावे . मनांत माझ्या दिव्यज्ञान नित्य प्रकाशावे ... 5 प्रभू प्रिया, तूं गौरवी लागों दे तुझी ओढ, मनांत शास्त्र ठसवी तें फार वाटो गोड ... 6 --HBalentine