183 मनुष्याची अपूर्णता

मराठी

183 मनुष्याची अपूर्णता पुष्कळ अजुनी उणा,| प्रभू , मी | पुष्कळ अजुनी उणा रे ... ध्रु खंडीतून रति नाहीं फेडिले बंधुभगिनींच्या ऋणा रे ... 1 तुझा ऋणी तर सदाच राहीन, अगा पतितपावना रे ... 2 किती लाजतो मनात ठाउक तुजवांचून हे कुणा रे ? ... 3 असे करावें, तसे करावें, वायां मम वल्गना रे ... 4 टाकाऊ मी परंतु, सदया, आवडलो त्वन्मना रे ! ... 5 जसा पाहिजे तुला तसा मी करूं कसा आपणा रे ? ... 6 ख्रिस्ता, ख्रिस्ता, घे घे अवघा हा माझा मीपणा रे ! ... 7 -- ना.वा.टिळक