मराठी
184 पश्चातापी मनुष्याच्या भावना
हे देवा, तूं प्रसादमेवा,
कृपा करुनी मज द्यावा हो,
करुणा करुनी दोष निरसूनि
घ्यावी माझी सेवा हो ... ध्रु
अन्यायापासुनियां माझ्या
मजला निर्मल धुवा हो,
पापापासूनि शुद्ध करा मज,
हें मी मागे, देवा हो ... 1
अंगिकारितसें मी, देवा,
आपुल्या अपराधांना हो,
तेवीं अंतरी नित्य असती
त्या गुप्तही मम पापांना हो ... 2
एजोबानें स्वच्छ करा मज,
निर्मल तैं मी होइन हो,
धुवा म्हणजे बर्फापेक्षां
शुभ्र सदा मी होइन हो ... 3
अघांपासूनि, देवा, अपुले
मुख आटोपूनि घ्यावे हो,
माझी पापें सारी पुसुनी
टाकुनी दूरी द्यावीं हो ... 4
--- सी. पी. फॅरार