185 पश्चातापी मनुष्याचे अश्रू

मराठी

185 पश्चातापी मनुष्याचे अश्रू पतितासु जगतीं साचे बहू भासती मोलाचे ... ध्रु प्रस्तरहृत प्रभुप्रीती फोडी, पुनरपि तें प्रभुपदिंही जोडी, बलिदान करी ती साचें प्रेमेचिं स्वप्राणाचें ... 1 अंतरी बघतां वेडा झालों, परी प्रभुदर्शन धालों, मम शल्य जें मनीं खोंचें जातां तें हर्षें नाचे ... 2 दूतांचे गण मोदें डुलती अनुतापी जैं शोका करिती ; म्हणती तुम्ही त्या प्रभूचे गुण गात रत व्हा साचे ... 3 खेद वृथा जरी कृतकर्मांचा निश्चय करी तैं सुविचारांचा, प्रणतासी उध्दाराचा, प्रभू खडक ख्रिस्तची साचा ... 4 -- कृ. चं. सरोदे