मराठी
187 पापाबद्दल दु:ख
दु:ख वाटतें, रे प्रभू, दु:ख वाटतें,
सर्व पापें आठवितां हृदय फाटते ...ध्रु
केली पापें पदोपदी गोड भासूनी,
होती दुर्गुणांची धुंदी माझ्या नयनीं ... 1
काम, क्रोध, गर्व यांनीं होतो वेढीला
दयानिधे तूंच माझा पीळ काढला ... 2
दया, प्रीती, शांती, कांही नव्हती मना
अशा संदूणांत होतों फार मी उणा ... 3
तुझें रक्त मोलवान त्यांत धुऊंनी,
मान पुण्यवान मला जवळ घेऊनि ... 4
खोड माझी सर्व पापें क्षमा करुनी,
आलो तुजकडे आतां नम्र होउनी ... 5
नको नरकीं टाकूं अशा कष्टी कोकरा,
वागवुनी घेई मला हे विश्वंभरा ... 6
दासा होई मोठा हर्ष क्षमा पावतां,
शांती बहू होई मणी पापें हरतां ... 7
--दा. ल. साळवी