मराठी
188 पश्चाताप करण्याची आवश्यकता
पाप्यानें रडोनी पश्चातापी व्हावें,
शरणचि जावें देवबापा ... 1
दुष्टाच्या नाशांत माझा तोष कांही
कालत्रयीं नाही, म्हणे देव ... 2
त्यापेक्षां तयाने फिरावें, तरावें,
यांत मनोभावें संतोषें मी ... 3
ख्रिस्तानें केलेल्या प्रायश्चितामुळें
सर्व पापमुळें जाळील तो ... 4
सदात्म्याकडूनी करील पवित्र,
ख्रिस्त पुण्यवस्त्र देईल त्या ... 5
अंतकाली स्वर्गी जवळी घेईल,
पुत्रसे करील वतनाचे ... 6
त्र्येक देव; भक्त; पवित्र टेन दूत
पाहतां, अदभूत वाटेल, तै ... 7
देव गूढ गोष्टी प्रगट करील;
कोण तै वर्णील सुखानंद ? ... 8
प्रभूच्या प्रीतीची लांबी, रुंदी, उंची
वर्णाया बुद्धीची गती खुंटे ... 9
---- कृ. र. सांगळे