मराठी
189 स्वानुभवकथन
नको, प्रभू ,तरी मजला सोडूं .
शरण पतित मी तुजला रे ... ध्रु
क्षणोक्षणीं मी पापें करितों,
मन हें मज अकळेना रे;
काय करू ? हा जीव तगमगतो,
ताव पदीं नाही रुजला रे ... 1
सुभावनेची, कुभावनेची
हृदयीं झटपट होतां रे,
कुभावनेला वंश मी होतों,
व्रण माझा ना बुजला रे ... 2
अरे, अरे, मी माणूस कष्टी
मर्त्य तनूपासूनिया रे
कोण करी मज मुक्त, दयाला,
तुजविण जीव हा सुजला रे ... 3
अमुच्या प्रभू ख्रिस्ताकडुनी मी
स्तुती करितो देवाची हो,
स्वतां मला प्रभूसेवा आवडे,
पण हा देहच कुजला रे ... 4
--- कृ. र. सांगळे