मराठी
190 अंगीकारार्थ विनंती
प्रभू, आतां मजला करुनि घेइ गोड ...ध्रु
पापें छपाया बहू युक्ती केल्या,
परी तूं उघड केली खोड ... 1
ताव दृष्टिपुढूनी जावें, परी तूं
सर्वज्ञ, धरिलेस सोड ... 2
अति बेशरम मी, ताव नाम प्रीती,
कर माफ, मन द्वाड फोड ... 3
जाणुनी नेणें, निरुपाय झालों,
एखादी मज सांग तोड ... 4
अत्यंत कडू मी, इतरां न करवे,
परि तूं सबळ करिस गोड ... 5
ख्रिस्तामुळे बा मज उद्धरी, कां
ख्रिस्ताकडे माझी ओढ ... 6
--- कृ. र. सांगळे