मराठी
191 तारणाप्रीत्यर्थ प्रार्थना
प्रभू, मज तारण दे पतिताला ...ध्रु
पुण्य नसे, प्रभू, संग्रही माझ्या,
पाप परी अहिताला ... 1
दडपतसें मी बहू अधभारे;
जाइन मृत्युपथाला ... 2
वैद्य नसे प्रिय तुजविण ऐसा
सुधरील पापक्षतांला ... 3
सर्वसमर्था, इच्छिसी तुंही,
स्मर तर याही तिताला ... 4
काय करुं मी सांग मला, प्रभू ,
सुख व्हाया जीविताला ... 5
पतितांचा तूं मित्र, अहा, दे
कान विनंतिगीताला ! ... 6
--- कृ. र. सांगळे