मराठी
192 जिवनामृत ख्रिस्त
प्रभू हे जीवनामृता रे,
तुजविण जाऊं कुठे ? ...ध्रु
जीवनाच्या गोष्टी तुजपाशीं, आहा,
तुजवीण सारे खुटे ... 1
बहू यज्ञ केले, धन अर्पियेले,
तरी पापदंड न सुटे ... 2
अंत:करण हें बहू घट्ट पाहा,
तुजविण कैसे फुटे ? ... 3
जरी सर्व पृथ्वी धुंडाळिली म्यां
तरी शांती नाही कुठे ... 4
--------कृ. र. सांगळे