193 पापांगीकार

मराठी

193 पापांगीकार मज अंगिकारी, हें ताता तुज शरण आलो मी आता ... ध्रु विरुद्ध नभाच्या, समक्ष्य तुझ्या मीं केले पातक. तूं बा दाता ... 1 ताव पुत्र मीं, हें म्हणणे उचित ना, दासासम मज ठेवी नाथा ... 2 तनु काष्ट झाली, वस्त्रेंहि चिंध्या; ठेवितों तव चरणीं माथा ... 3 अक्षम्य पापें केली खचित मीं; दुसरा तुजविण कोण त्राता ... 4 ---कृ. र. सांगळे