मराठी
194 कृतघ्नतेमुळे दु:ख
ऐसें असता स्मरलो नाहीं देवा हो,
व्यर्थ दवडिलें आयुष्य, कैची सेवा हो .ध्रु
कैसा उदरीं मातेच्या जन्म दिला हो
बहू प्रयासें प्राण हा वाढविला हो ... 1
पृथ्वीवरती मजला जन्मविलें हो,
दु:ख संकटें रोगहि निवारिले हो ... 2
अन्नवस्त्रही पुरविले योग्य कालीं हो,
कधीं उपाशीं निजवीलें नाही खालीं हो ...3
निरुपायी कीं पाहूनियां भ्रष्ट माला हो
जगीं स्वपुत्रा धाडिलें तारायाला हो ... 4
दंड पुत्रासी लाविला पापियांचा हो
प्रलय लोटिला त्यावरी यातनांचा हो ... 5
मंदक्रोधही होऊनियां वाट पाही हो
बहू प्रसादाची दया गेली नाहीं हो ... 6
---कृ. र. सांगळे