195 सद्गुरूप्राप्ती

मराठी

195 सद्गुरूप्राप्ती पातकाच्या राशी पोंचल्या आकाशीं, तरी कोणापाशीं जाऊं आतां ? ... 1 अगणित पापें त्यांही ओझें झालें शरीर चेंचलें, काय करूं ? ... 2 जप, तप, यात्रा, यत्न बहू केले, भोंदुनीयां खाल्लें बहुतांनीं ... 3 परी निरुपाय रडें धायधाय, कोण बाप माय शांती देई ? ... 4 रात्रंदिन झोप नेत्रांसी कोठोन ? साह्यकारी कोण ? हेंचि सांगा ... 5 ऐशा दु:खामाजी शोधला उपाय, सद्गुरूचे पाय सांपडले ... 6 केली क्षमा त्यानें, शांती पूर्ण दिली, मुक्ती प्राप्त झाली पतितांस ... 7 ----- अज्ञात