200 पापांची फळें

मराठी

200 पापांची फळें तन, मन, धन संपत्ती हि कैसी वाईट कामासी लावियेली ... 1 काम, क्रोध, लोभ, मोह व मदादि, संचरले हद्दीपलीकडे ... 2 सद्सद्विवेक बोथुनी टाकीला, पशूहूनि झाला नीच नर ... 3 उडविली ना हि संपत्ती बापाची ? असंख्य पापांची झाली रास ... 4 कर्तव्य न केलें, वर्ज्य तेंचि केलें, सर्वायुष्य गेलें पापामध्यें ... 5 सद्गुणांची मंदी, दुर्गुणांची धुंदी माजलासे नंदी पोळ जैसा ... 6 उपकार झाले अनंत जयाचे बंड केलें साचें त्यावरीच ... 7 --- कृ. र. सांगळे