मराठी
202 पापाचा दुष्परिणाम
पुत्र असता तो सर्वसमर्थाचा\n
पुढे झाला सैतानदास साचा .\n
कसा मुखला तो शांतीसुखाला \n
पापसेवा करी टाकुनी पित्याला ..1\n\n
सुखे ऐहिक हि टरफलासमान\n
श्रमे उधळ्या परी पुरती लाभती न \n
सदा असूखी, अतृप्त, उदासीन \n
निराश्रीत तो बापडा कसा दिन ..2\n\n
देवबापाची प्रसन्नता प्रीती \n
सर्व सद्रूण , सुख, शांती, हर्ष ,कीर्ती \n
अशा मुकला तो सर्व चांगल्याला \n
कसा अमृत टाकुनी विषच प्याला ..3 \n\n
जगी पाहता पाप दिसे सारे \n
खून, चोरी, व्यभिचार,गर्व बा रे \n
द्वेष, निदा, अन्याय, लाच, आढी,\n
युद्ध ,भांडणही , ठकविणे,लबाडी ..4\n\n
सर्व पृथ्वीवर दुःख ,रोग पाहा,\n
त्रास, दारिद्यही, मरण,शोक, आहा\n
घोर रात्रदिन शास्त्र मना कांची,\n
कशी दु सह हि फळे पातकांची..5\n\n
सर्व मानव हो पातकात मेले \n
ईश्वराच्या ते कृपेतूनी गेले,\n
दंड दुःखेही पुढे नारकडोही;\n
दुरावस्था मनुजाची कशी हो हि ..6\n\n
---कृ. र. सांगळे