मराठी
203 पापताप
तोवरी संताप ,संताप ,\n
जोवरी पदरी पाप ...धु \n \n
अभिमानें आकळिले ;\n
जोवरी क्रोधपिशाचे पिळीले ..1\n\n
हार फुलाचा दिसशी,\n
अवचित साप भयंकर होशी ..2\n\n
ज्ञानतरंगी तऱशी\n
गरगर मोहवती फिरशी ..3\n\n
ख्रिस्ताला वंश आता\n
पुनरुपी वंश होशी निजचित्ता ..4\n\n
म्हणं आपणा तरलेला,\n
जा कर बोध समस्त जगाला ..5\n\n
मीपण जोवर मेले\n
नाही, खांबावरती खिळिले ..6\n\n
\t\t\t\t\t\t\t\t\t- ना. वा. टिळक\n