मराठी
206 पश्चात्ताप
येशू, पाहा बुडतों;
तुझ्या पायां पडतों,
कृपेनें तूं उद्धरी,
पातकें क्षमा करीं ... 1
प्रभू हे कृपामया,
दे मला तूं आश्रया.
करिशी तूं समाधान,
देईही तूं जीवदान ... 2
माझीं पापें जाणशी,
तूं निष्पाप असशी,
तुझे पुण्य मागतों,
दुजी आशा सोडितों ... 3
येशू, तूंची तारिता,
मोठी तुझी ममता,
पायां पडतों लाचार,
प्रभू, दे मला उद्धार ... 4
--- H Balentine