207 देवदयेसाठीं विनंती

मराठी

207 देवदयेसाठीं विनंती देवा, मला क्षमा करीं कोपू नको माझ्यावरी, तुझी अनंत करुणा, दयेनें एक प्रार्थना ... 1 माझे अन्याय होती थोर, मजला योग्य दंड घोर, देवा तू हो तरी उदार, तुझ्या कृपेस नाहीं पार ... 2 खोडूनी पाप सगळें मला करीं तू मोकळें, हें पाप भार वाटतो, त्यामुळें जीव कण्हतो ... 3 मीं अपराध केले फार, धिक्कारिलेहि ऊपकार, हीं पातकें पत्करितो, तीं आठवूनी लाजतो ... 4 ऐसा जरी तूं पातकी टाकुनी देशिं नरकीं, तरी अन्याय तो नसे, दोष देऊं तुला कसे ? ... 5 प्रभू, क्षमा, क्षमा करीं ! मज पाप्यास उद्धरी; सच्छास्त्रवाक्यस्मरणीं होऊं दे शांती मन्मनीं ... 6 --- H ब्लेंतीने