208 अनुतप्त वृत्ती

मराठी

208 अनुतप्त वृत्ती माझ्या जीवास पापभार अत्यंत जड वाटतो, प्रभू, प्रभू, मी हीन फार, पडुनि पायां प्रार्थितों ... 1 हे येशू, प्रेम वर्षूनी भरीं मनांत सांत्वना, तुझा स्वभाव देउनी करीं विलीन मन्मना ... 2 तोडुनि पापबंधने करी विमुक्त तूं मला, मना प्रकाशवीं, जिणें जडीं तुशीं, सुमंगला ! ... 3 वृत्ती तुझीच पाहुनी धरीन मी; प्रभो, सदा; दिला तूं खांब वाहुनी पावें संतृप्ति सर्वदा ... 4 सामर्थ्यहीन मी असें; प्रभू , शक्तीस पुरवीं; किं तारिता दुजा नसे, त्वरें मुक्तीस पोंचवीं ... 5 ---- एमिलि बिसल