मराठी
209 देवकृपेकरितां याचना
तारका, प्रभू दयाळू,
माझ्या मित्रा ममताळू,
मी पापाने कष्टी आहें,
तारणाची वाट पाहें,
दोषी आहें, मी पत्करी;
दंड यावा माझ्यावरी;
प्रभू पडें तुझ्या पायां,
ये करीं कृपा, ये साह्या ... 1
कोणाकडे मीं धावावें ?
कोणा दु:ख मीं सांगावें ?
तूंची जीवनाचा दाता,
तूंची पापियांचा त्राता,
खांबी क्लेश भोगिलेशी,
तेथें रक्त गाळीलेंशी
ते गळालें माझ्यासाठीं,
माझें ओझें तुझ्यापाठीं ! ... 2
आतां नाश कैसा व्हावा ?
डाग कां तुला लागावा ?
हे प्रभू, करीं तूं कृपा,
सोडीं सोडीं माझ्या पापा !
आतां दाविलीस प्रीती
मी गाईन मोठी स्तुती;
दूत बहू मान देती,
स्वर्गामाजी स्तोत्रें गाती ... 3
---- H Balentine
__________________________________________________________________________________
210 दुष्ट स्वभावाचें चित्र
अहा ! कसें हें घडतें
कीं पाप मनीं भरतें
विचार शुद्ध नसती,
व जीभ रागें बोलती ! ... 1
माझा कसा हो हा दुर्भाव
कीं कोणि घेतां माझें नांव
तेव्हांच दावा धरितों,
मी सूड घ्याया पाहतों ... 2
येशू जगीं ह्या राहिला
तैं नम्रतेनें वर्तला,
मुकेंच सोशी हेलना,
असा कित्ता मी घेईना ... 3
वैऱ्यांचे हित पाहतां
त्यासाठी जिवा अर्पितां
अर्वाच्य दावी करुणा,
मी दुष्ट कीं तें स्मरेना ... 4
प्रभू, ये अंत:करणी,
लागें तुझ्या चरणीं
तुझा मला दे प्रेमभाव;
तुझ्या मला सेवेला लाव ... 5
------- मेरी ई. बिसल