मराठी
211 पापांगीकार
ते धन्य केवडे
जे क्षमा पावले !
ज्या पापी दुर्जनाकडे
न्यायत्व मोजिले ... 1
ते दोषां आठवून
दु:खाने रडती,
मनाला नित्य आंवरून
दुर्भाव सोडीती ... 2
मी पापा झाकितो,
तोवरी झुरतो,
त्या पापा अंगीकारी तैं
क्षमा मी पावतों ... 3
हे दीना, प्रार्थना
चालूं दे सर्वकाळ,
हे पाप्या, भक्तिभावना
धरुनी नाशा टाळ ... 4
--- H Balentine