मराठी
213 पापामुळें शोक
हे ईश्वरा, तुझ्यासमोर
मी पडतों लाचार,
कृतघन भारी, पापी थोर,
दुष्कर्मी अनिवार ... 1
केव्हांही दुष्ट नव्हता
या माझ्यासारिखा,
दुर्बुद्धि, सत्यद्वेषिता,
लोभी मी कितका ! ... 2
प्रभू, ऐसें हे दुष्टपण
चाले कोठवरी ?
तूं मोडी माझें घट्टपण,
मना नवें करीं ... 3
मला दीना बंदीवाना
दुर्बुद्धि घालवी,
प्रभू, हे सामर्थ्यवाना,
त्वरें तूं सोडवीं ! ... 4
---- H Balentine