214 दयेसाठीं याचना

मराठी

214 दयेसाठीं याचना देवा, हे कृपावाना, माझी एक प्रार्थना; मी दुर्बुद्धि, मी उणा, दे, दे, दे कृपादाना ! ... 1 भ्रष्ट, मूर्ख मी झालों, मी केलेंहि वेडेपण; तुला सोडूनी गेलों, नाशामार्गी माझें मन ... 2 उडवी तुझ्या माला उधळ्याच सारिखा, चालें स्वैर सर्वदा मानीना संबोधका ... 3 तुझी स्तुती गाईना, केले तुच्छ उपकार, ख्रिस्तपाय धरीना, मी धिक्कारिला उद्धार ... 4 ईश्वरा, मी पापी, थोर, तुझा पुत्र मी नाहीं; येतो मी तुझ्यासमोर, त्राही तूं, मला त्राही ! ... 5 --- H Balentine