215 अनुपकारीपणा

मराठी

215 अनुपकारीपणा देवाचे उपकार मी तुच्छ मानूं काय ? धिक्कारू एवढा उद्धार असुनी हीनोपाय ? ... 1 पापाने हृदये किती हो घटली ! देवाबापाशी निश्चयें तीं कैसीं फितली ! ... 2 हे प्रभू , जीवनी आम्हा नवें करीं . हा दुष्टपणा मोडुनी मणी प्रीती भरी ... 3 स्वपापें आठवून आम्ही रडावे फार, देवाची कृपा मिळवून मानावे उपकार ... 4 --- H Balentine