मराठी
216 पापावस्थेतून जागृति
सिनाची गर्जना अघोर
ऐकुनी भीती वाटे थोर,
आश्रय मिळेना;
कानीं ते वाक्य गाजतें,
पुन्हां जन्मावें लागतें,
तैं होई यातना ... 1
मीं नेमशास्त्र पाहिलें
तो त्यांत शाप देखिले
होईना समाधान;
शास्त्रही सर्वा सांगतें,
पुन्हां जन्मावें लागतें,
खोंचती मना बाण ... 2
भक्तांनी ख्रिस्ता वंदुनी
गाईली त्याची करणी,
हें ऐकें वारंवार;
हें वाक्य परी राहते;
पुन्हां जन्मावें लागतें,
मी झालो निराधार ... 3
मी क्लेशीं ऐसा असता
ख्रिस्तानें केली ममता
हा किती प्रेमभाव !
ख्रिस्ता, सदात्म्याकडोनी
जन्म नवीन देवोनि
तूं चित्त वर्ते लाव ... 4
--- H Balentine