217 दु:खित मनुष्याचे उद्धार

मराठी

217 दु:खित मनुष्याचे उद्धार देवा कृपामया, मी पायां पडतों, ह्या चेंचलेल्या हृदया तुलाच अर्पितो ... 1 देवाचा कोकरा तयावरी सदभाव, कीं आश्रया न दुसरा, मी घेई त्यांचे नाव ... 2 माझी हि कृत्यें काय ? पुण्याने मी विहीन, ख्रिस्तेची साधिला उपाय, तेणें तरेल दीन ... 3 --- H Balentine