मराठी
218 दयेकरिता प्रार्थना
देवा, तूं क्षमा करी,
आशा भारी अंतरी;
मोठी तुझी करुणा;
ऐकें माझी प्रार्थना ... 1
माझी पापें झाली थोर,
मला योग्य दंड घोर,
देवा,पातकें सोडी,
माझी दुर्बुद्धि मोडी ... 2
किती चाललो मोकाट
तुच्छ केले उपकार
हाचि भार वाटतो,
आत्मा माझा कण्हतो ... 3
ऐसा जरी पातकी
टाकिलाशी नरकीं,
तरी न्याय तो होई,
तुला दोष तो नाहीं ... 4
प्रेमें तूं क्षमा करीं,
देवा, मला उध्दरी;
कृपाही मजवरी;
तेणें शांती हो खरी ... 5
---- H Balentine
__________________________________________________________________________________________
219 दास्यविमोचन
बापा करुणाकरा, ईश्वरा,
हा माझा तूं म्हणशी जयाला
धान्य मनुज तो खरा ... ध्रु
मोशासमही नरा, ईश्वरा,
तुझया दयेनें आप्तजनाचा
केला रवी दूसरा, ईश्वरा ... 1
प्रताप ताव घाबरा, ईश्वरा,
करी हीनबल, दीन, हीनमति,
विलिन मिसरेश्वरा, ईश्वरा ... 2
दीर्घदास्यनतशिरा, ईश्वरा,
प्रणतजनाला क्षणांत केलें स्वतंत्र,
विश्वमंभरा, ईश्वरा ... 3
दुभागूनी सागरा, ईश्वरा,
तुवां आणिलें सांभाळूनीया
याहुदीय जण धरा, ईश्वरा ... 4
मजला लघु लेकरा, ईश्वरा,
म्हण, हें माझें सदैव,
सदया प्रेमाच्या आगरा, ईश्वरा ... 5
ने ने अपुल्या धरा, ईश्वरा,
भवसिंधूंतून सांभाळून तूं
मजलाही पामरा, ईश्वरा ... 6
--- ना. वा. टिळक