220. देवाची वत्सलता

मराठी

220. देवाची वत्सलता परमपवित्रा, तुझिया पुढतीं क्षणमात्र स्तिथि माझी होता ... 1 दिसे मज माझें स्वरूप भयाण, येथून तेथून अमंगल ... 2 आलों त्याच पायीं वाटे परतावें, तोंड लपवावें कोठें तरी ... 3 नरक कशाचा ? स्वयें मी नरक मूर्त भयानक वाटे मला ! ... 4 अशालाही तुझें प्रेम अंगीकारी, आलिंगाया करीं पुढें धावें ! ... 5 दास म्हणे, धन्य तुझी वत्सलता ! एवढेंच, ताता, खरें तेथें ... 6 ---ना. वा. टिळक