मराठी
221 सदगुरुस्मरण
स्मर सद्गुरुचे पाय, मन तूं
स्मर सद्गुरुचे पाय ... ध्रु
स्मर, भज, सेवीं, तर्पी, अर्पी
त्यास आपुला काय ... 1
विसरून त्याला करिशील ते ते
उपाय सर्व अपाय ... 2
अंक न मागें वृथैव शुन्या
गणूनी मिळणे काय ... 3
भुक्ति, मुक्ती तव अक्षय तव जरी
एक सखा गुरुराय ... 4
नित्य निरामय आनंदाचा
ख्रिस्तच केवळ ठाय ... 5
---- ना. वा. टिळक