223 ख्रिस्ताचें उदार प्रेम

मराठी

223 ख्रिस्ताचें उदार प्रेम शिष्यही गणाया नाहीं योग्य जो त्याला ! मित्र तूं जीवाचा म्हणशी उदार दयाला ! ... ध्रु धूल जी तुझ्या पायांची तिच्याही कणाची योग्यता न माझी,सदया प्रभू,दुर्बलाची साउली न घ्यावी ज्याची तुवां त्या खलाला प्रेमानें घ्यावें स्कंधीं ! काय म्हणू झाला .1 दिव्य वैभवाचें नाही मोल वाटलें ना ? मर्त्य देह माझ्यासाठीं मान्य जाहला ना ? ठोकिले खिळे देहीं, हें सर्व सोसलें ना ? काय नांव देऊं न कळे ह्या तुझ्याच शीला . 2 प्रेम मूर्त आलें, झालें सर्वथैव माझें ! ज्याकडे बघाया माझा जीव फार लाजे, अंक तूंच शून्यामागें मोल देशिं त्याला, तुझा तूंच सांभाळीं रे ह्यापुढें तुझ्याला ! .3 -- ना. वा. टिळक