मराठी
224 उद्धारक ख्रिस्त
प्रभूवीण मज कोण पार
करील करील करील करील ?.. ध्रु
मी पापी दोषनिधी
चंचल अति, पूर्ण कुधी,
प्रभूवीण मज कोण हृदीं
धरील धरील धरील धरील ? ... 1
दुर्बल मी मीच भंड
दुर्विचार करीं उदंड,
प्रभूवीण मम पापदंड,
कवण भरील भरील भरील ? .. 2
वंदू जण मज निंदू,
तोच मात्र दयासिंधु,
हा माझा प्रिय बंधू
म्हणून वरील वरील वरील ... 3
आंवरील, सांवरील,
तोच मला वागवील,
चिंताभयमोह सकल
हरील हरील हरील हरील ... 4
---ना. वा. टिळक