मराठी
227 आशेचा आधार
ख्रिस्त हाचि पाया आशेचा खंबीर
माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी .. 1
माझी आशा मात्र ख्रिस्तपुण्यावरी,
कोण मला तारी ख्रिस्ताविना ? ... 2
अरिष्टप्रलयी ख्रिस्त हा अढळ,
नांगरा सबळ तोचि थारा ... 3
सदूचन त्याचें मला टेंका देई,
तेणें धैर्य येई, आशा लागे ... 4
ख्रिस्त पुन्हा येई, न्याय ठरवाया
तेव्हां मीं भेटाया सिद्ध व्हावें ... 5
त्याच्या पुण्यवस्त्रें मी पांघरलेला
तेजस्वी झालेला सांपडावा ... 6
-- मेरी ई. बिसल