228 पापविमोचनार्थ प्रार्थना

मराठी

228 पापविमोचनार्थ प्रार्थना अतां धांवत ताव पदांजवळ यावें, मला वाटे परि काय मीं करावे ? प्रभो, माझे करचरण लुले झाले, वैर पापानें पुरें साधियेलें ... 1 मला, बापा, ये, उचल तूंच आतां ! नाहीं नाहीं, तुजविण कुणी त्राता ! नीच माझ्यासम जगीं दुजा नाहीं, परी सीमा प्रीतीस तव न काहीं ... 2 ---- ना. वा. टिळक