229 सद्गुरुचें अगत्य

मराठी

229 सद्गुरुचें अगत्य व्यर्थ खटाटोप सोडा, सद्गुरुचरणीं जडा हो ... ध्रु न्यायी प्रभू हा अन्यायि तुम्ही हो बहू शोक करुनी रडा हो ... 1 अति शुद्ध प्रभू हा, अपवित्र तुम्ही हो, गुरुपुण्यवस्त्री दडा हो ... 2 कर्माभिमाना सोडूनि अगदी घ्या लीनतेचा धडा हो ... 3 पतितार्थ गुरुनें अर्पूनि प्राणा रक्ताचा केला सडा हो ... 4 सुविचार करुनी ख्रिस्तासी वंदा, जलदीच भरतो घडा हो ... 5 ---कृ. र. सांगळे