मराठी
230 ख्रिस्ताच्या मैत्रीचें अगत्य
प्रभू हा प्रिय तूं जोडुनी ठेव ... ध्रु
सुखद:खाला, अडल्या वेळीं,
कामी पडे हि ठेव ... 1
पापमूळा तो नाहीसें करीं,
परमपराक्रमी देव ... 2
ह्या मित्रानें स्वरक्त पाडुनी
केलें तारण, जेव ... 3
मृत्यूखिंडीतुनि नेउनियां
दाविल तुज तें पेव ... 4
---- कृ. र. सांगळे
_______________________________________________________________________________________
231 तारणाची भिक्षा मागणें
देवा, मज द्यावी तारणाची भिक्षा,
नाहींच अपेक्षा दुजी कांही ... 1
नम्रतेची वाटी विश्वासाच्या हातीं,
भिक्षा घाली बा ती तारणाची ... 2
भावें नम्रतेनें आले जे शरण,
तयांसी तारण दिधलेंस ... 3
पाप्यां तारायाला स्वपुत्र दिलासी;
प्रीति जनां कैसी दाविलीस ! ... 4
मागतांना मिळे, शोधितां सांपडे,
ठोकितां उघडे; भाक तुझी ... 5
ऐशा तुझ्या वार्ता ऐकिल्या स्वकर्णी,
म्हणुनी अंगणी आलों, देवा ... 6
मंदक्रोध बहुप्रसाद तूं बा रे,
परत माघारें लावूं नको ... 7
---कृ. र. सांगळे
________________________________________________________________________
232 जीवनान्नोदकार्थ भिक्षा
प्रभू,जीवनाचें मजला दे अन्नपाणी..ध्रु
अन्न, उदक कीं ज्ञान जगिक हें,
तृप्ती न होई या सुखांनी ... 1
परमार्थाच्या भुकतहानेनें,
व्याकुळ झाला दीन प्राणी ... 2
पतितच घाले बहू ताव दानें,
वदती पवित्र शास्त्रवाणी ... 3
शोमरूनी स्त्रीशीं दिधलेंसी जें,
तेंचि माळ दे गोड पाणी ... 4
क्षीणहि झाला हा जीव, डोळा,
पडू दे सुवार्ता मम कानीं ... 5
संजीवनाचें अन्न उदक तूं,
प्रार्थितों मी जोडूनि पाणी ... 6
--- कृ. र. सांगळे
_____________________________________________________
233 सद्गुरुस शरण जाणें
शरणागत ताव पाया
मजला तारावें, गुरुराया ... ध्रु
तूं तर कृपेचा सागर,
आहेस करुणाकर,
आम्हां दीनातें उद्धर ,
कर, प्रभू, सत्वर
मजवर कृपेची कर छाया ... 1
तूं तर पवित्र निर्दोषी,
न्यायी पूर्ण असशी,
तरी तूं झालासी जगवासी
पाप्या तारायासी,
किती वर्णू मी ताव दया ... 2
केवळ हिन दीन मी बहू पापी,
साधनहीन तथापि,
झाल्या पापांच्या बहू राशी;
भुललों जगमोहासी,
जाई न तरितां वृद्ध काया ... 3
परी मी जगांत किलवाणी
फिरतों रानोरानीं,
आलों ऐकुनी तव वाणी
घ्याया जीवनी पाणी;
पश्चात्ताप्यांनो, या प्याय ... 4
--- यमुनाबाई कोतक