234 द्वारीं उभा असलेला ख्रिस्त

मराठी

234 द्वारीं उभा असलेला ख्रिस्त ख्रिस्त आला दारीं तुझ्या हृदयाच्या, हाकेलागीं त्याच्या कान देई ... 1 कान देती त्यांशी बोलतो मधुर, उघड सत्वर दार तुझें ... 2 थकला, दमला, उभा ठाकुनियां, वाट पाहूनियां, मित्रा, तुझी ... 3 किती वर्षे गेलीं तुला पाहूनियां, अजुनी का वायां गुंतलासी ? ... 4 पातकभाराने नारकी जाशील, कसा सुटशील सांग मातें ... 5 तारावया तुज आला तुझ्या दारीं, म्हणुनी माघारीं लावूं नको ... 6 ---- वि. भा. करमरकर