मराठी
236 स्वपुण्याची निष्फळता
सदाचरणानें पुढें वर्तताही
तरी पूर्वीचा दोष कमी नाहीं;
ज्ञान, विद्या, अधिकार, कुळ यांही,
आणि द्रव्यानें मुक्ति नसे पाहीं ... 1
प्रार्थनाहि स्तुतिभक्तिचा आवेश,
शास्त्रावाचानही, देउळीं प्रवेश;
पाप यांनीही, जात नाहीं पाहा
तुम्ही सुविचारें शोध करावा हा ... 2
जसा उधळ्या सर्वस्वी नम्र झाला,
पाप पत्करुनी पित्या शरण आला,
कृपादानचं ते मात्र इच्छियेले
नाहीं महती व पुण्य दावियेले ... 3
तसा पापी जाईल शरण देवा,
त्याची इच्छा जाणुनी करील सेवा;
कृपेवरती टेकेल ख्रिस्तयाच्या
करील माफी तो पातकांची त्याच्या ... 4
पिता आज्ञापिल तेंच मी करीन,
मार्ग दावील जो तोच मी धरीन,
हीच उत्कंठा मुख्य मनीं ज्याची,
देव बहू हर्षें क्षमा करील त्याची ... 5
-- कृ. र. सांगळे