237 माझा वाली ख्रिस्त

मराठी

237 माझा वाली ख्रिस्त कोण दुजी मज माय प्रभूवीण कोण दुजा मज बाप ? ...ध्रु बाप, बाप ! ह्या उच्चाराची स्फूर्ती होय अपाप - प्रभूवीण ... 1 मोहजाल हें वारून ठेवी कोण मला निष्पाप ?- प्रभूवीण ... 2 प्रेमाचें त्या प्रभुरायाच्या कोण करी जगीं माप ?- प्रभूवीण ... 3 कोण हरी मम त्याविण दुसरा षडिपुकृत संताप ?- प्रभूवीण ... 4 कोण धावतों त्याविण ऐकून माझे दीन विलाप ?- प्रभूवीण ... 5 --- भा. कृ. उजगरे