मराठी
239 पाप्यास आमंत्रण
अहो कष्टी, आतां या,
ख्रिस्ताठायीं शांती घ्या,
टाका ओझीं त्यावारीं,
दु:खें जाती सत्वरीं ... 1
भीता देवकोपा फार,
ख्रिस्तरक्तें घ्या उद्धार,
पुत्र दाविदाचा तो,
प्रेमें हाका मारितो ... 2
दु:खी, नीच, अंधळें,
दीन, दोषी, खंगले,
ऐसे येशूपाशी या,
कृपा उद्धाराची घ्या ... 3
--- H Balentine