240 पातक्यांनी दुमार्ग सोडणें

मराठी

240 पातक्यांनी दुमार्ग सोडणें पातक्यांनो, परता; कां तुमहीं हो मरतां ? ज्यानें तुम्हां निर्मिलें, मोठ्या प्रेमें पाळिलें, तो दयाळू पुसतो, पातक्या विचारीतो. प्रीति त्याची तोडुनी कां हो जाता मरुनी ? ... 1 पातक्यांनो, परता; कां तुमहीं हो मरतां ? प्राण ज्यानें आपुला तुम्हांसाठीं अर्पिला, तो तुम्हाला पुसतो, सर्व दु:खें दावितो, त्यासही धिक्कारूनी कां हो जातां मरुनी ? ... 2 पातक्यांनो, परता, कां तुमहीं हो मरतां ? तो सदात्मा येउनी दावी मार्गा जीवनी; तो तुम्हां विचारितों; केवी प्रेमें ओढितो त्यासही अव्हेरुनी कां हो जातां मरुनी ? ... 3 --- H Balentine _________________ ________________________________________________ 241 खिरस्ताचें आमंत्रण अहो कष्टी, लादलेले, तुम्ही ख्रिस्तापाशीं या, नका राहू श्रमलेले त्याची कृपा आतां घ्या; नाहिं संतां उद्धरी तो पापियां ... 1 स्वतां आम्ही सुधरूनी साधूं आपुला उद्धार, म्हणतां कधीं न ऐसें ख्रिस्तालागीं सोपा भार; दीन पाप्या, नाहिं तो धिक्कारणार ... 2 पहा बागि कण्हतांना प्रिय प्रभू रडला; ऐक, खांबी चेचतांना कैसा तो ओरडला पूर्ण झालें, पूर्णोध्दार साधिला ... 3 आतां स्वर्गीं बापापाशीं तो मध्यस्थी करितो; ठेवा भाव, जडा त्याशीं, तो दीनाला तारितो; येशू हाचि पातक्यां उद्धरितो ... 4 --- H Balentine