मराठी
242 अनुतापी पाप्याची क्षमा
असें मी पाहिलें
भटके मेंढरू,
मीं मेंढपाळा द्वेषिलें,
मीं मूर्ख कोकरू;
असें उनाड पोर,
पित्या न देईं मान,
घारांस सोडीं, जाई दूर,
हिंडेहि रानोरान ... 1
पित्यानें शोधिलें
त्या हट्टी लेकरां,
त्या मेंढपाळें धुंडिलें
उनाड कोकरा;
जै शोध लागला
असें तैं मृतप्राय,
तयाने प्रेम दाविलें
करुनियां उपाय ... 2
हा येशू मेंढपाळ
करी अत्यंत प्रेम;
धुई स्वरक्ते पापगाळ,
अनंत देई क्षेम;
येशूने शोधूनि
माघारे आणिले,
स्वकळपांत घेउनी
मला सांभाळिले ... 3
अतां न हिंडे मी
भटके मेंढरू;
प्रिय प्रभूचे ऐकें मी,
तयाचे कोकरू;
नसें उनाड मी,
पित्यास देई मान,
मी तत्त्समिप राहुनी
असेन हर्षवान ... 4
---- H Balentine